सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2018 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने ओढून नेलेल्या 14 वर्षीय मुलाच्या शोधमोहीमेला आज पहाटेपासून पुन्हा सुरुवात झाली. वनविभाग पाच बोटींच्या सहाय्याने मुलाचा शोध घेत आहे.
पळूस तालुक्याच्या ब्रम्हणाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी (20 एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेलं.