सांगली : शिवरायांचा पुतळा न बसवल्याने तासगावात नगराध्यक्षांच्या दालनाची तोडफोड
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांच्या दालनात तुफान राडा केला. नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनी शिवाजी महाराजांचा पुतळा न बसवल्याने त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेले शिवसेना पदाधिकारी आणि नगराध्यक्षांमध्ये वाद झाला. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनात धूडगुस घातला. शिवाय 30 जुलैपर्यंत शिवरायांचा पुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशाराही शिवसेनेकडून नगराध्यक्षांना देण्यात आला आहे.
Continues below advertisement