सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, तीन लहान मुलं जखमी
Continues below advertisement
सांगली शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्रिमुर्ती कॉलनीत भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन लहान मुलं जखमी झाले आहेत. या जखमी बालकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉग स्कॉडने मोहीम राबवत कुत्र्यांना पकड़ले आहे. गेल्या वर्षाभरापासून सांगली, मिरज, कुपवाड भागात भटक्या कुत्र्याचा प्रश्न गाजतो आहे. या भटक्या कुत्र्यावरून मनपाला 15 लाखांचा दंड देखील झाला आहे. मात्र तरीही सांगलीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. वांरवार होणाऱ्या या घटनांमुळं शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Continues below advertisement