सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्येच्या निषेधार्थ 'सांगली बंद'ला गालबोट, बसवर दगडफेक
Continues below advertisement
दरम्यान अनिकेत कोथळेच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सांगलीत सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला. मात्र काही आंदोलकांनीऔरंगाबादहून सांगलीत येणाऱ्या बसवर दगडफेक केल्यामुळं बंदला गालबोट लागलं.. पोलिसांनी तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण आणलं. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी पोलिसांवरचा राग काढण्याच्या हेतूनं हे कृत्य केल्याचा संशय़ व्यक्त केला जातोय. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी अनिकेतच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केलीय. आतापर्यंत अनिकेतच्या मृत्यूप्रकरणी 12 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचं निलंबन करण्यात आलंय.
दमदाटीनं पैसे वसूल केल्याचा आरोपात अनिकेतला अटक करण्यात आली होती. यानंतर कोठडीत पोलिसांनी थर्ड डिग्री दिल्यामुळं अनिकेतचा मृत्यू झाला. मात्र कथित सेक्स रॅकेट द़डपण्यासाठी अनिकेतची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान अनिकेतच्या हत्याप्रकरणी आतापर्यंत 12 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.