ब्रेकफास्ट न्यूज : सांगली : संभाजी भिडेंचे कार्यकर्ते यंदाही पालखी मागे चालणार
संभाजी भिडेंचे कार्यकर्ते आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमागे चालणार आहे. गेल्यावर्षी यावरुन मोठा वाद झाला होता. त्यामुळे यंदाही यावरुन वाद होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान खबरदारी म्हणून आळंदी सोहळा प्रमुखांनी आधीच पोलिसांना याबाबतचं पत्र दिल्यानंतर पोलिसांनी शिवप्रतिष्ठानला नोटीस बजावली.