सांगली : संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनासाठी आयोजित महामोर्चाला धारकऱ्यांची मोठी गर्दी, महिलांचाही मोठा सहभाग
भारिप बहुजन महासंघाच्या एल्गार परिषदेला उत्तर देण्यासाठी सांगलीसह संपूर्ण राज्यभरात शिवप्रतिष्ठानतर्फे मोर्चाचं आय़ोजन केलं. तर दुसरीकडे पुण्यात शिवप्रतिष्ठानतर्फे निषेध सभा घेतली गेली. पुण्यातही पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मोर्चा निघाला. तिकडे नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा समितीने महाल मधल्या शिवाजी चौकात आंदोलन केलं. यावेळी दंगली मागच्या खऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये संभाजी भिडे यांच्या समर्थनासाठी मोर्चे काढले जात आहेत. त्यात , सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिकमध्येही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.