सांगली : जप्त केलेले ट्रक वाळूमाफियांनी पळवले, चार अटकेत
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातील विटा तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेले ट्रक वाळूमाफियांनी पळवून नेले आहेत. बेकायदेशीर वाळू वाहतूकप्रकरणी हे ट्रक जप्त करण्यात आले होते. काल मध्यरात्री कार्यालयाचे गेट तोडून हे ट्रक पळवण्यात आले. यातील एक ट्रक मागे घेत असताना कार्यालयाच्या भिंतीला धडकला. यावेळी हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी विटा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
Continues below advertisement