सांगली : पांढऱ्या दुधातील काळे बोके बाहेर येतील, सदाभाऊ खोतांचा दूधसंघांवर निशाणा
Continues below advertisement
‘शेतकऱ्यांना जर तुम्ही 28 रुपये दुधाला दर दिला नाही तर सरकारच्या तिजोरीवर तुम्ही डल्ला मारताय हे स्पष्ट होईल. मग मात्र मी मुख्यमंत्र्याकडे दूधदरात ३ रुपये कपात करण्याची मागणी करणार आहे,’ असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दूधसंघांना दिला आहे. ‘सरकारने दुधाला दिलेल्या 5 रुपयांच्या दरवाढीच्या निमित्ताने पांढऱ्या दूधातील हे काळे बोके कोण आहेत, हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समजेल, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला. सांगलीतील पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी दूधसंघांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. ‘आम्ही तोटा सहन करून 23 रुपये दूधाला दर देत होतो, असा कांगावा हे दूध संघवाले आता करायला लागतील. पण सरकारकडे 5 रुपये दरवाढ तुमचा तोटा भरून काढण्यासाठी मागितली की शेतकऱ्यांसाठी मागितली?’ असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
Continues below advertisement