Flood Help | सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदत कॅम्प सुरु | ABP Majha

Continues below advertisement
सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून आलाय.
संघाच्या जनकाल्याण समितीच्या वतीनं सांगलीत सर्वात मोठा मदत कँप सुरु केलाय.
विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरात सध्या हे सेवाकार्य सुरु आहे.
इथं हजारो पूरग्रस्तांच्या जेवनाची आणि निवासाची सोय करण्यात आलीय. लहान मुलामुलींपासून वयोवृध्दांपर्यत प्रत्येकजण कामात व्यस्त आहेत..भल्य़ा पहाटेपासून इथं स्वयंपाकाला सुरूवात होते आणि बनवलेले जेवण पॅकिंग करुन स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीनं गरजुंच्या हातात पोहोचवतात. किमान २ महिने कॅम्प चालवण्याची संपूर्ण तयारी असून इतर शहरांमधूनही मदतीचा ओघ वाढतोय.
या कामात सांगली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष गणेशदादा गाडगीळ आणि भिलवडीचे नानासाहेब चितळे यांच्यासह शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग घेतलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram