सांगली : अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, दीपक केसरकरांची माहिती

Continues below advertisement
अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसंच अनिकेतच्या हत्येचा खटला सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे सोपवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
दरम्यान आज सांगलीत झालेल्या सर्वपक्षीय बंदला गालबोट लागलं. यावेळी काही जणांनी औरंगाबादहून सांगलीत येणाऱ्या बसवर दगडफेक केली. मात्र पोलिसांनी तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण आणलं. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी पोलिसांवरचा राग काढण्याच्या हेतूनं हे कृत्य केल्याचा संशय़ व्यक्त केला जातोय. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी अनिकेतच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. दमदाटीनं पैसे वसूल केल्याच्या आरोपात अनिकेतला अटक करण्यात आली होती. यानंतर कोठडीत पोलिसांनी थर्ड डिग्री दिल्यामुळं अनिकेतचा मृत्यू झाला. मात्र कथित सेक्स रॅकेट द़डपण्यासाठी अनिकेतची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान अनिकेतच्या हत्याप्रकरणी आतापर्यंत 12 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना निलंबीत करण्यात आलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram