सांगली : राज्यभर सन्मान मोर्चे, मात्र संभाजी भिडे कुठे होते?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2018 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरेगाव-भीमा हिंसाचारात संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी होत असताना भिडेंच्या समर्थनार्थ आज राज्यभर सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं..शिवप्रतिष्ठानच्या झेंड्याखाली हे मोर्चे काढण्यात आले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी होतीये. मात्र कोरेगाव-भीमाप्रकरणात संभाजी भिडेंचा सहभाग नाही असा दावा करत समर्थकांनी राज्यभरात मोर्चे काढले....पुण्यात पोलिसांनी नाकारली असतानाही निषेध सभा घेण्यात आली,..या निषेध सभेत कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेची आईसुद्धा सहभागी झाली होती...खऱ्या आरोपींना अटक करा अशी मागणी करत धारकरी रस्त्यावर उतरले होते...सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, ,नाशिक, जळगाव, यवतमाळ, बेळगाव, गोंदिया, रायगड, नागपूर, सिंधुदुर्गात शिवप्रतिष्ठानचा आवाज दुमदुमला...