सांगली: अनिकेत कोथळे खूनप्रकरणी कामटेच्या मामेसासऱ्याला अटक
Continues below advertisement
सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणातील निलंबीत पोलिस अधिकारी युवराज कामटेच्या मामेसासऱ्याला अटक करण्यात आलीय. बाळासाहेब कांबळे असं अटक करण्यात आलेल्या इसमाचं नाव असून, त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. त्यांनं अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी युवराज कामटेला मदत केल्याचं सीआयडीच्या तपासात समोर आलंय.
Continues below advertisement