सांगली : राज्य सरकार मराठा आंदोलन हाताळण्यात अपयशी : पृथ्वीराज चव्हाण
मराठा आरक्षणावरुन राज्यात आंदोलन होतायत... मागील काही दिवसांत राज्यातल्या अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या... त्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपमध्येच मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली होत असल्याचा गौप्यस्फोट केला... त्यावर अपय़शी मुख्यमंत्री बदलून काही फायदा होणार नाही... मराठा आंदोलन सरकारला हाताळता आलं नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय... सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा जाहीरनामा काल जाहीर करण्यात आला. याप्रसंगी चव्हाण सांगलीत बोलत होते...