सांगली : मगरीपासून वाचण्यासाठी काय करावं?

Continues below advertisement
सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने ओढून नेलेल्या 14 वर्षीय मुलाच्या शोधमोहीमेला आज पहाटेपासून पुन्हा सुरुवात झाली. वनविभाग पाच बोटींच्या सहाय्याने मुलाचा शोध घेत आहे.

पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी (20 एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेलं.

सागर हा मूळचा बेळगाव इथला असून तो आपल्या मामाच्या गावी सध्या आला होता. मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरडा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत मगर त्याला पाण्यात घेऊन गेली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram