सांगली : मालकाने कृष्णा नदीत बुडवून घोडीचा जीव घेतला?
Continues below advertisement
सांगलीतील कृष्णा नदीत मालकाने घोडीला बुडवून मारल्याचा आरोप होत आहे. शहर पोलिस ठाण्यात अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे अधिकारी आणि प्राणीमित्र कौस्तुभ पोळ यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार घोडीचा मालक श्रीराम नरुटेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोडीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. या अहवालात घोडीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.
Continues below advertisement