सांगली : शून्य रुपये बिल कसं भरायचं? वेळेत न भरल्यास दहा रुपये दंड
सांगली : महावितरणच्या बिलासंदर्भातील अनेक घोळ आपण सतत पाहत असतो. कधी कुणाचे बिल वीज वापरापेक्षा जास्त येते, तर कधी कमी येते. मात्र सांगलीत महावितरणने एकाला चक्क शून्य रुपयांचे लाईट बिल पाठवले आहे. यात महावितरणकडून झालेली हद्द म्हणजे हे जर बिल वेळेत भरले नाही, तर 10 रुपये दंड भरण्याची सूचना केली आहे. यामुळे ज्याला हे बिल आले आहे, तो नेमके हे बिल वेळेत कसे भरायचे या कोड्यात सापडला आहे.