सांगली : आमदार सुमन पाटील यांचं येरळा नदीपात्रात उपोषण

Continues below advertisement
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील येरळा नदीपात्रात पिण्याचे आणि शेतीचे पाणी सोडून देण्याच्या मागणीसाठी आमदार सुमन पाटील यांनी उपोषण केलं. सांगली जिल्ह्यातल्या निमणी गावाजवळील येरळा नदीपात्रातच त्या उपोषणाला बसल्या. येरळा नदीपात्रात आरफळ आणि ताकारी योजनेतून पाणी न सोडल्यानं शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्णाण झाली आहे. सातत्यानं पाणी सोडण्याच्या केलेल्या मागणीकडं दुर्लक्ष केल्यानं त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. दरम्यान सात दिवसात पाणी सोडण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यावर सुमन पाटील यांनी उपोषण मागे घेतलं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram