Sangli Flood Effect | पुराच्या पाण्यात एलआयसी कंपनीतील कागदपत्रं वाहून गेल्याची भिती | सांगली | ABP Majha
महापुरामुळे नागरिकांच्या घरातील सामानाचं, जीवनावश्यक वस्तूंचं, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे आता विमा कंपन्यांवर मोठा ताण आलाय. आतापर्यंत कोट्यवधींच्या विम्याचे दावे दाखल झालेत. त्यात सांगलीतले छोटे-मोठे व्यावसायिक, वाहनं, दुकानदारांचा समावेश आहे. तरी, पूरग्रस्तांसाठी कार्यपद्धती सोपी करुन पूरग्रस्तांना लवकरात लवकर विमा मिळवण्याच्या दृष्टीनं विमा कंपन्या प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.