सांगली : सांगलीतील नव्या आणि जुन्या आयर्विन पुलाची कहाणी काय
जुन्या जाणत्यांकडून किंवा भूतकाळाकडून काहीच शिकायचं नाही... बहुदा असा चंग आपल्या व्यवस्थेने बांधला आहे... आता सांगलीच्या पुलाचंच उदाहरण घ्या... सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बांधलेल्या आयर्विन पुलाला आजपर्यंत कृष्णा नदीनं कधीच स्पर्श केला नाही... पण त्यानंतर सुमारे 125 वर्षानंतर बांधलेल्या नव्या पुलावरुन कृष्णेचं पाणी दरवर्षी वाहतं... आता याला प्रगती म्हणायची का?