सांगली : विश्वास नांगरे पाटलांसह सीआयडी प्रमुखांकडून अनिकेत कोथळेच्या कुटुंबाचं सांत्वन
Continues below advertisement
सांगलीतल्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलिसांचं निलंबन झालं आहे. ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस आणि रात्री ड्यूटीवर असणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं गेलं. त्यामुळे याप्रकरणात आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलीस निलंबित केले गेले आहेत. दरम्यान, ज्या सेक्स रॅकेटमुळे अनिकेतची हत्या केल्याचं बोललं जातं. त्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं गेलं असून त्यांची चौकशी होणार आहे. सांगलीतल्या लकी बँग हाऊसमध्ये अनिकेत कामाला होता. त्याठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. काही दिवसांपूर्वी पैसे उकळल्याचा आरोपात अनिकेतला अटक झाली होती, मात्र कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण करुन त्याचा मृतदेह परस्पर जाळून टाकल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.
Continues below advertisement