लोकसभा/विधानसभा पोटनिवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Continues below advertisement
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक आणि पलूस कडेगाव विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले यांनी उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळी इथे भाजपकडून नाना पटोले विजयी झाले होते. पण त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राजीनामा दिला त्यानंतर इथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे इथे दुरंगी लढत होणार आहे. तर सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघातही दुरंगी लढत होते. पंतगराव कदम यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. इथे काँग्रेसकडून त्यांचे पुत्र विश्वजित कदम मैदानात आहेत तर भाजपकडून संग्रापसिंह देशमुख आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram