स्पेशल रिपोर्ट : सांगली : वऱ्हाड आलं फॉरेनहून, लंडनच्या मायकलचं सांगलीच्या तृप्तीशी लग्न
लक्ष्मणरावांनी ‘वऱ्हाड निघालय लंडन’ला साकारलं. मात्र आता ‘लंडनचं वऱ्हाड आलं सांगलीला’ अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही. सांगलीत पार पडलेलं एक ‘आंतरराष्ट्रीय’ लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लंडनचे पाहुणे नाच-नाच नाचले. नवरदेव मायकल घोड्यासोबत. तर लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर. सांगलीच्या पोलिस मुख्यालयातल्या हॉलमध्ये फिरंगी माहोल होता आणि या परदेशी बाबूची देशी हिरॉईन थेट पालखीतनं आली.