सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का, 11 आजी-माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल

Continues below advertisement
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलंय. कारण सांगली महापालिकेतील 11 आजी-माजी नगरसेवकांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळं हाती घेतलंय. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थित हा प्रवेश करण्यात आला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये 7 विद्यमान तर 2 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस -राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात असून भाजपला मोठे बळ मिळणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram