सांगली: संभाजी भिडे समर्थनार्थ मोर्चे, सांगलीत जय्यत तयारी
Continues below advertisement
कोरेगाव-भिमा हिंसाचारात आतापर्यंत संभाजी भिंडेंविरोधात पुरावे सापडले नाही, असं मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितलं. यानंतर आज भिडेंच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी मोर्चे निघणार आहेत. आज सांगलीत संभाजी भिडे गुरुजीच्या समर्थनार्थ सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय...मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसानी सांगली शहरात बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत पथसंचलन केलं...तर तिकडे पुण्यात सुरक्षेचं कारण पुढे करत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारलीये...शिवप्रतिष्ठानतर्फे शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार होता...मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतही सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात जमू आणि लालमहालापर्यंत चालत जाण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठाननं केलाय...
Continues below advertisement