धनगर आंदोलन | सांगली | आटपाडीतील बस डेपो बंद, वाहतूक ठप्प
इकडे सांगलीतल्या आटपाडीमध्ये धनगर समाजाचे आंदोलक रस्त्यावर उतरल्यानं बस डेपो बंद ठेवण्यात आला. त्यामुळे सोलापूर आणि कराडकडे जाणारी एसटी वाहतूक ठप्प आहे. तर दुसरीकडे सांगलीत धनगर समाज आरक्षण अॅक्शन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडूनही आज धरणे आंदोलन करण्यात आलं.