सांगली : दोन महिन्यानंतर अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार
Continues below advertisement
सांगली शहर पोलीस ठाण्यात थर्ड डिग्रीच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेचा मृतदेह ताब्यात घेण्याचा कोथळे कुटूंबाने निर्णय घेतला. आज कोथळे कुटुंब अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे अंत्यसंस्कार करणार आहे. मागील दोन महिन्यापासून अनिकेतचा जळालेला मृतदेह मिरज शासकीय मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठीठेवण्यात आला होता. चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळेचा बडतर्फ पीएसआय युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे.
Continues below advertisement