स्पेशल रिपोर्ट : सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्याकांडाच्या घटनाक्रमावर खास रिपोर्ट
Continues below advertisement
सांगलीमध्ये पोलिसच आरोपीची हत्या करतात. पोलिसच त्याचे मृतदेह जाळतात आणि पोलिसच पोलिसांच्या मुसक्या आवळतात. सांगलीतल्या अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी आता संताप वाढू लागला आहे. एकीकडे मानवाधिकार आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना नोटीस धाडली आहे, तर तिकडे आरोपी पोलिसांना 12 दिवसांची कोठडी मिळाली आहे. पण या सगळ्या प्रकरणी पोलिसांची इभ्रत मात्र चव्हाट्यावर आली आहे. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत... नक्की काय काय झालं?
Continues below advertisement