सांगली : सद्भावना रॅलीनंतर चक्कर येऊन मुलीचा मृत्यू

Continues below advertisement
सद्भावना एकता रॅलीत भोवळ येऊन मृत्यू झालेल्या ऐश्वर्या शाशिकांत कांबळे या 14 वर्षीय मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन इन कॅमेरा झालं. या अहवालात आतड्याला रक्तपुरवठा कमी झाल्याने ऐश्वर्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगलीत काल सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सद्भावना एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

या रॅलीत जिल्ह्यातील नागरिकांसह शाळकरी मुलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. रॅलीमध्ये  ग. रा. पुरोहित कन्या शाळेची विद्यार्थिनी ऐश्वर्या कांबळे ही देखील सहभागी झाली होती. रॅलीची सांगता झाल्यानंतर ती घराकडे परतत होती. पण विठ्ठल मंदिरसमोर तिला भोवळ येऊन, ती बेशुद्ध झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram