सांगली: ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये चिरडून चिमुकलीचा मृत्यू

Continues below advertisement
ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये चिरडून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात घडली आहे. श्रद्धा कुंडलिक पाटील असं या 8 वर्षीय चिमुरडीचं नाव आहे. सावर्डे गावात घराजवळून जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये बसण्याचा हट्ट श्रद्धा आणि तिच्या भावानं धरला. यावेळी ट्रॅक्टर चालकानं त्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवलं. आणि शेतामध्ये रोटावेटर मारण्याचं काम सुरु केलं. मात्र याचवेळी श्रद्धाचा हात सुटला. आणि ती फिरणाऱ्या रोटावेटरमध्ये गेली. काही कळायच्या आत श्रद्धा यामध्ये चिरडली गेली. या घटनेमुळं सध्या गावात शोककळा पसरली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram