सांगली : आठ महिन्यांच्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार, आठ जणांवर गुन्हे
सांगली जिल्ह्यातल्या तुरची गावात गर्भवती महिलेवर आठ जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आहे. घटनास्थळी या आठ आरोपींनी महिलेच्या पतीला एका कारमध्ये डांबून ठेवलं आणि महिलेवर बलात्कार केला.