500 ₹ Currency Note | पाचशेच्या नोटांचे घडी घालताच तुकडे, विटा शहरातील प्रकार | सांगली | ABP Majha
Continues below advertisement
सांगलीतील विटा शहरात 500 रुपयांच्या नोटांचे तुकडे पडू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. 500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच त्यांचे तुकडे होत आहेत. वाळलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे हाताने चुरगळता, मोडता येते, त्याप्रमाणे 500 रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुकेडे होत असल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात समोर आला आहे. यामुळे प्रत्येकजण आपल्या 500 च्या नोटा तपासून पाहत आहेत.
विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक दळवी यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी प्रात्यक्षिक दाखविले. राठोड यांनी जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांच्या बाबत हा प्रकार घडला. राठोड यांना पाचशे रुपयांची एक नोट जी बऱ्यापैकी एका बाजूने तुटली होती ती बदलून देण्यात आली आहे परंतु उरलेल्या तीन हजार रुपयांचे तुकडे बदलून मिळाले नाहीत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी राठोड यांनी केली आहे.