सांगली: चिमुकलीच्या धाडसामुळे लहान भाऊ वाचला
Continues below advertisement
सांगलीत एका चिमुकलीने मोठ्या धाडसाने आपल्या लहान भावाचे प्राण वाचवले. वसवडे गावातील चार वर्षाची स्नेहल आणि दोन वर्षाचा सुजल हे दोघेही घराच्या अंगणात खेळत होते. यावेळी सुजल खेळता खेळता पाण्याच्या टाकीकडे गेला. स्नेहलच्या हे लक्षात आलं आणि ती सुजलकडे धावली. तितक्यात सुजलचा तोल गेला आणि तो टाकीत पडला. यावेळी स्नेहलने त्याचा एक पाय पकडला होता. मात्र, त्याचं शरीर पाण्यात बुडालं. अशा परिस्थितीत प्रसांगवधान राखल स्नेहल जोरात ओरडली. तीच्या आवाजाने घरातील लोक धावत आले. त्यांनी तातडीने सुजलला बाहेर काढलं. त्याच्या पोटात गेलेलं पाणी काढलं आणि सुदैवाने त्याचे प्राण वाचले.
Continues below advertisement