सांगली: ट्रक उलटून अपघात, 10 मजुर जागीच ठार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागलेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे.
तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रकमधून कर्नाटकमधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते.
योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला.