सांगली: अनिकेत कोथळे खूनप्रकरणी कामटेच्या मामेसासऱ्याला अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Dec 2017 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पोलिस दलाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अनिकेत कोथळे खून प्रकरणातील निलंबीत पोलिस अधिकारी युवराज कामटेच्या मामेसारऱ्याला काल अटक करण्यात आलीय. बाळासाहेब कांबळे असं अटक करण्यात आलेल्या इसमाचं नाव असून, त्याला सीआयडीने आज न्यायालयात हजर केलं.