Congress NCP alliance | विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-राष्ट्रवादी 125-125 जागा लढवणार | ABP Majha

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजणार आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून आता युतीच्या जागावाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola