संगमनेर, अहमदनगर : बाळासाहेब थोरात यांच्या कारखान्यावर आंदोलन
ऊसाला दोन हजार 550 रुपये भाव जाहीर करावा, या मागणीसाठी संगमनेरमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह भाजप, शिवसेनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. ऊसाला योग्य भाव मिळाला नाही तर गव्हाणीत उडी मारण्याचा इशाराही या मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.