अहमदनगर | संगमनेर परिसरात चोरट्यांचा उच्छाद, सात घरफोड्या
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय..आंबी खालसा गावातल्या ७ घरांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय..सोन्या-चांदीच्या रकमेसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची माहिती आहे..याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..चोरट्यांच्या उच्छादामुळं संगमनेर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे..