crocodile attack | सांगलीत मगरीची दहशत, 12 वर्षीय मुलाला नदीत ओढून नेलं | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2019 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कृष्णा नदी काठावरुन मगरीने ओढून नेलेल्या 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला आहे. वन विभाग आणि जीवरक्षक टीम कालपासून नदीपात्रात आकाश जाधवचा शोध घेत होते. अखेर 12 तासांनी आकाशचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. आकाश हा नदी काठावर वीटभट्टीचं काम करणाऱ्या कुटुंबातील मुलगा होता. तो मूळचा कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील आहे. सांगलीजवळच्या मौजे डिग्रज गावात कृष्णा नदी पात्रात वावरणाऱ्या मगरीने 12 वर्षीय आकाश जाधव हल्ला केला आणि त्याला नदीत ओढून नेलं होतं. मात्र तो बाहेर न आल्याने अत्याधुनिक बोटींच्या मदतीने कालपासून त्याचा शोध सुरु होता.