पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि विचारवंत भाई वैद्य कालवश

Continues below advertisement
दुपिंडाचा कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भाई वैद्य यांचं पार्थिव आज रात्री लॉ कॉलेज रोडवरील त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल. त्यानंतर उद्या सकाळी 7 वाजता साने गुरुजी स्मारक येथे ठेवले जाईल. दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा आणि संध्याकाळी 6 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक-राजकीय कारकीर्दीत आयुष्यभर लोकशाही आणि समाजवादी मूल्यांची जोपासना करणारं व्यक्तिमत्त्व भाई वैद्य यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेले. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, आणीबाणीविरोधी आंदोलन इत्यादी अनेक आंदोलनांमध्ये भाई वैद्य यांनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram