Mannat Bungalow | सलीम खान यांच्या 'त्या' प्रश्नामुळे 'मन्नत' सलमानऐवजी शाहरुखच्या मालकीचं! | ABP Majha

Continues below advertisement
बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानचं निवासस्थान 'मन्नत' पाहण्यासाठी देशभरातून चाहते मुंबईत गर्दी करतात. दोनशे कोटींच्या घरात किंमत असलेलं शाहरुखचं हे आलिशान घर कदाचित बॉलिवूडच्या दुसऱ्या सुपरस्टारच्या मालकीचं असतं. अभिनेता सलमान खानचा 'मन्नत'वर डोळा होता, मात्र वडिलांनी हटकल्यामुळे सलमानने बंगल्याच्या खरेदीचा नाद सोडला होता. सलमान आणि शाहरुख खान यांच्या यारी-दोस्तीचे किस्से बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. मुंबईत वांद्र्याच्या समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यावर शाहरुखच्या आधी सलमानची नजर पडली होती. सलमानने वडील अर्थात प्रख्यात लेखक सलीम खान यांचं मत विचारात घेतलं. मात्र सलीम खान यांनी लेकाचं म्हणणं धुडकावून लावलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram