मुंबई : साकीनाकामध्ये साबणाच्या गोदामाला आग
Continues below advertisement
साकिनाक्याच्या खैरानी रोडवरील भानू फरसाणला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच, रात्री याच विभागातील एका साबणाच्या गोदामाला आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात केमीकल आणि सोडा असल्यानं ही आग भडकली. पहाटे दोनच्या सुमारास गोदामाच्या वर राहायला असलेल्या कुटुंबाच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर घराकडे निघालेले नगरसेवक किरण लांडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोदामाकडे धाव घेत, शटर गोदामाचं शटर उघडलं अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, आगीच्या धुराचा केमिकलयुक्त वास सर्वत्र पसरल्यानं परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतोय.
Continues below advertisement