आखाडा परिषदेचे महंत मोहनदास गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता
Continues below advertisement
राम रहीम, आसाराम बापूसहित अऩेकांना भोंदू बाबा ठरवणाऱ्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत मोहनदास यांचं अपरहरण झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या 10 दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. त्यांचा शोध लागत नसल्यानं अखिल भारतीय आखाडा परिषद चिंतेत आहे. 15 सप्टेंबरला महंत मोहनदास रेल्वेनं हरिद्वारहून मुंबईकडे निघाले होते. मात्र या प्रवासातच ते बेपत्ता झाले. तपासात त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन मेरठ इथं मिळालं. मात्र तिथून पुढे त्यांचा मोबाईल बंद झाला. काही दिवसांपूर्वीच आखाडा परिषदेच्या बैठकीत महंत मोहनदास यांनी भोंदूबाबांची एक यादीच जाहीर केली होती. ज्यात राम रहीम, आसाराम बापू, राधे माँ, निर्मल बाबा यासह अऩेकांची नावं होती. भोंदूबाबांची यादी जाहीर झाल्यानंतर महंतांना अनेक धमक्याही मिळाल्या होत्या.
Continues below advertisement