Sadhvi Pragya | नथुराम गोडसे देशभक्तच, साध्वी पुन्हा बरळली | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त आहे आणि सदैव राहील, असं वक्तव्य भोपाळची भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहने केलं आहे. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन उफाळलेला वाद शांत होत नाही, तोच प्रज्ञासिंहने आणखी एक वाद ओढवून घेतलेला दिसत आहे. भाजपकडून यावेळी मात्र साध्वीला माफी मागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 'नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंहने केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram