VIDEO | सचिन पायलटांकडून राहुल गांधींच्या निर्णयाचं स्वागत | मास्टरस्ट्रोक | नवी दिल्ली | एबीपी माझा
प्रियंका गांधी आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये केवळ पडद्याआडच काम पाहत होत्या. लोकसभा निवडणुकीत अमेठी, रायबरेली या दोन मतदारसंघांचीच जबाबदारी त्यांच्यावर असायची. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर प्रियंकांच्या एन्ट्रीची चर्चा थांबलीय असं वाटत असतानाच काँग्रेसनं आज ही सरप्राईज खेळी केली. संघटनेत पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यांना पद देण्यात आलंय. एका अर्थानं त्यांच्या राजकीय प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली आहे.
आता प्रियंका गांधींच्या महासचिव पदानंतर त्यांच्या निवडणूक लढण्याबाबत काय घोषणा होते याचीही उत्सुकता आहेच. त्यामुळे काँग्रेसनं अगदी राखून ठेवलेलं हे ब्रम्हास्त्र आता त्यांच्या किती फायद्याचं ठरणार याचं उत्तर लवकरच मिळेल.