नागपूर : तलाक पीडितांना आरएसएस प्रति महिना 500 रुपये पेन्शन देणार

Continues below advertisement
मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता तलाक पीडित महिलांसाठी पेन्शन सुरु केले आहे. या स्कीमची सुरुवात वाराणसीतून झाली आहे...  संघाशी संलग्न असलेल्या मुल्सिम राष्ट्रीय मंचानं हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाद्वारे तीन तलाक पीडित महिलांना प्रतिमहिना 500 रुपयांचे पेन्शन मिळणार आहे.. या उपक्रमामध्ये आता मशिदींमध्ये जमा होणाऱ्या जकातीचा सहभाग करावा अशी मागणी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केली आहे.
देशात ८००० कोटी रुपयांचा वार्षिक जकात गोळा होतो असा दावा मुस्लिम मंचाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे या निधीतून अनेक तलाक पीडित महिलांचे आयुष्य सुकर होईल असा दावा आहे.
दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेनं मुस्लिम महिलांसाठी उचललेले हे पाऊल धार्मिक राजकारणाचा भाग आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram