नागपूर : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराचा मार्ग निश्चित करणार : भय्याजी जोशी
Continues below advertisement
राममंदिराच्या बाबतीत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच पुढचा मार्ग निश्चित करण्यात येईल असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केलंय. राम मंदिराच्या निर्मितीबाबत सर्वसहमतीनं निर्णय होण्याच्या बाजूने आम्ही आहोत परंतु आजपर्यंतच्या अनुभवानुसार सहमती होईल असं वाटत नाही असंही जोशी म्हणाले. संघाच्या प्रतिनिधी सभेची आज नागपुरात सांगता झाली. यावेळी जोशी बोलत होते. दरम्यान संघाच्या सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
Continues below advertisement