VIDEO | डान्सबारची बंदी उठल्याने आर. आर. आबांची लेक संतापली | एबीपी माझा
साधारण 15 वर्षांपूर्वी या डान्सबारमुळे तरुणांचे आयुष्य बरबाद झालं होतं. हसती खेळती कुटुंबं उद्धस्त होत होती. बारबालांवर उधळलेल्या पैशांमुळे अनेकजण देशोधडीला लागण्याच्या मार्गावर होते. या सगळ्या प्रकारामुळे तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. पाटील अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी 2005 मध्ये राज्यातील डान्स बारवर बंदी घातली. पण पुन्हा डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आबांची कन्या स्मिता पाटल यांना संताप अनावर झाला. एबीपी माझाशी बोलताना काय स्मिता पाटील काय म्हणाल्या पाहुयात..