खेळ माझा : रुट मोबाईलला ठाणेवैभव करंडक अ गटाचं विजेतेपद

Continues below advertisement
रुट मोबाईलनं ठाणेवैभव करंडक क्रिकेट स्पर्धेत अ गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रुट मोबाईलनं ग्रेटर मुंबई पोलिसांचा ५५ धावांनी पराभव केला. हा सामना ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आला. रुट मोबाईलनं अख्तर शेखच्या अर्धशतकाच्या जोरावर ३५ षटकांत नऊ बाद 238 धावांची मजल मारली होती. त्यानंतर रुट मोबाईलच्या प्रभावी आक्रमणासमोर ग्रेटर मुंबई पोलिसांचा डाव १८३ धावांत आटोपला. रुट मोबाईलचा ऑफ स्पिनर विशाल धागावकरनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तसंच हितेश परमार आणि सिद्धार्थ नरसोमय्यानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रुट मोबाईनं गेल्या वर्षी ठाणेवैभव करंडकाच्या ब गटाचं विजेतेपद पटकावलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram