नवी दिल्ली : मुंबई-दिल्ली नवीन एक्स्प्रेस वे बांधण्याची नितीन गडकरींची घोषणा
मुंबई-दिल्ली नवीन एक्स्प्रेस वे बांधण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या टाऊन हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली. तब्बल एक कोटी खर्चून हा एक्स्प्रेस वे उभारण्यात येणार आहे. या एक्स्प्रेसवेमुळे मध्य प्रदेश, राजस्थानमधील मागास भागदेखील जोडले जाणार आहेत.