VIDEO | अभिनेता रितेश देशमुखची मोदींवर टीका, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल | एबीपी माझा
'56 इंचाची छाती' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर टीका करणारा अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढलेला असताना रितेशचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.